प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
न्यायकोर्टांचा फार्स.- यानंतर न्यायकोर्टांचा न्यायनिवाडा सुरू झाला. डंडी येथील कोर्टासमोर सर्व संपवाल्यांना खेंचून आणलें आणि त्यांच्या तुकड्या करून एकेका तुकडीवर स्वतंत्रपणें आरोप ठेवण्यांत आले. एका तुकडील रीतीप्रमाणें सात दिवस सक्तमजुरी मिळाली. त्यावेळीं हे शिक्षा झालेले सर्व लोक एक स्वरानें म्हणाले कीं, “तीन पौंड पट्टी बंद होईपावेतों आम्ही काम करणार नाहीं, आपण काय वाटेल तें करा. गेले तीन दिवस आम्ही अन्नावांचून आहों. मरूं एक दिवस. मरण एकदांच मरावें लागतें सात दिवसांऐवजीं ५।६ महिन्यांची शिक्षा आपण द्याना.”