प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण २ रें.
विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त.

मानववंशः- मानववंश हा शब्द डार्विनच्या {kosh Descent of Man.by Charles Darwin.}*{/kosh} मताप्रमाणें मानवसदृश प्राण्यांची एका पोटजात (Variety) यास अनुलक्षून वापरला आहे.

मा न वा चें प्रा णि प रं प रें त स्था न.- प्राणिशास्त्रांतील वर्गीकरणाप्रमाणें मनुष्य हा सस्तन प्राण्यांच्या वर्गांत असून व्यक्त अशा शब्दोच्चारणामुळें तो इतर प्राण्यांहून भिन्न झाला आहे. मनुष्य हा विचारशक्ति व स्पष्ट शब्दोच्चारणाची शक्ति यांही युक्त असा प्राणी आहे.

मा न वा चा वि का स.- मनुष्य हा मानवसदृश मर्कटापासून विकास होऊन उत्पन्न झालेला नाहीं तर एका पूर्वजापासून मनुष्य व मानवसदृश मर्कट हे दोन्हीहि उत्पन्न झाले असावे.

मा न वा च्या में दू ची वा ढ.- मर्कटाशीं तुलना करितां मनुष्याचा मेंदु १:३ या प्रमाणांत असतो. पूर्वी कवटीच्या आकारावर मेंदूची व त्यामुळें मानसिक शक्तीची इयत्ता ठरवीत असत. परंतु कवटी मोठी असणें हें शरीराच्या वृद्धीचें अंग असल्यामुळें त्यामध्यें व मानसिक उन्नतीमध्यें कोणत्याहि रीतीचा संबंध नाहीं. कवटीच्या ऐवजी मेंदूचें व विशेषत: मेंदूंतील पांढ-या पदार्थाच्या आवर्ताचें परीक्षण करणें जास्त आवश्यक आहे. अलीकडे तर कित्येक शास्त्रज्ञ असें म्हणूं लागले आहेत की, मेंदूचा मनाशीं संबंध नसून मनाचें स्थान कुंडलिनी आहे.