प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
मार्ग व त्याचीं विशेषणें (तै.सं.)
अंजसायनी | शेवट) | १संचर |
अघ्वन् | पथिन् | सुग |
अपथ | पथ्य | सुपथ |
काष्ठा (मार्गाचा | रथस्पष्ट | स्रुती (मार्ग) |
(अथर्ववेद) | ||
२परिरथ्य- |
१संचर- तै. संहिता ग्रंथांत ह्याचा अर्थ प्राण्यांच्या संचाराचा मार्ग असा आहे. नेहमीचा सामान्य अर्थ म्हटला म्हणजे यज्ञात भाग घेणा-या अनेक ॠत्विजांनीं व्यापलेला किंवा उपयोगात आणलेला यज्ञांतल्या जागेवरील मार्ग असा आहे.
२परिरथ्य- अथर्ववेदामध्ये हा शब्द असून ह्याचा अर्थ एक तर रस्ता किंवा त्याचा भाग. कदाचित् लुडविग व व्हिटने म्हणतात त्याप्रमाणें काठ असा अर्थ असावा. ग्रिफिथ याचा अर्थ आकाशाचे मध्यवर्ती प्रदेश असा करितो.