प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
मनुष्यसामान्यनामें [ ऋग्वेद ]
१ऊर्जव्य | ३पस्त्यावत् | ५मेध्य |
२द्विपाद् | ४पायु | ६रक्षितृ |
[ तै. सं. ] | ||
७जनता | १०भागदुध | १२मनुष्यविश् |
८पुरोधा | ११भ्रूणहन् | १३यायावर |
९ब्रह्मवादिन् | ||
[ अथर्ववेद ] | ||
१४चाक्षुष | १६ब्रह्मज्य | १८श्रोत्रिय |
१५तायादर | १७रथजूति | |
[ संदितेतर ] | ||
१९मंजिष्ठ | २०महाब्राह्मण | २१महाशाल |
१ऊर्जव्य् -- हा शब्द फक्त एक वेळच ऋग्वेदांत आला असून त्याचा अर्थ एका यज्ञ करणा-याचें नांव असा आहे असें लुडविग म्हणतो. तथापि रॉथ म्हणतो की, त्याचा अर्थ 'बलवान सशक्त' असा विशेषणात्मक आहे; आणि हें भाषांतर सयुक्तिक दिसतें.
२द्विपाद् -- 'दोन पायाचा' या शब्दावरून ऋग्वेद कालापासून पुढें झालेला ग्रंथांत चतुष्पादाच्या उलट अशा अर्थाचा म्हणजे मनुष्याचा बोध होतो.
३पस्त्यावंत -- पदपाठामध्यें पस्त्यावंत असा शब्द असून तो ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. त्यापैकी दोन ठिकाणीं श्रीमंत गृहस्थ असा त्याचा अर्थ होतो; व आणखी दोन ठिकाणी घर असा अर्थ स्पष्ट दिसतों.
४पायु -- रक्षक या अर्थाने हा शब्द ऋग्वेदामध्यें कित्येक वेळा आलेला आहें.
५मेध्य -- प्राचीन याज्ञिक हें मनुष्याचें नांव ऋग्वेदाच्या एका ऋचेंत आलेलें आहें. शांखायनश्रौतसूत्रामध्यें याला प्रस्कण्वाचा उपकार कर्ता पृषघ्र मेध्य मातरिश्वन् असें म्हटलें आहे.
६रक्षितृ -- रक्षण करणारा, पालक या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत व तदुत्तरग्रंथांत आलेला आहें.
७जनता -- हा शब्द तैत्तिरीय संहिता व तदुत्तर संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत वारंवार येतो. त्याचा अर्थ एका ज्ञातीचें लोक किंवा धार्मिक मंडळी असा होतो.
८पुरोधा -- याचा अर्थ पुरोहिताचें पद असा आहें. पुरोहित म्हणजे 'घरगुती भटजी' अथर्ववेद व तदनंतरचे ग्रंथ यांत आलेल्या या शब्दाच्या उल्लेखांवरून हें स्थान अथवा पद पूर्णपणे सर्वमान्य व उपयुक्त होतें असें दिसतें. ऐतरेय ब्रा. ७.३१ व ८.२४ येथें हा शब्द स्त्रीलेगी वापरला असून ८.२७ मध्यें त्याचा पुलिंगत्वानें निर्देश केला आहे. पूरोहित शब्दाचें अर्थ पुढील प्रमाणें होतात. (१) पुरोहित म्हणजें धर्मकृत्ये करणारा प्रतिनिधी (२) पुरोहित राजांच्या व सरदारांच्या घरी अथवा शहराबाहेर वनांत रहात असत. (३) पुरोहितावाचून देव हवन स्वीकारीत नाहींत असा समज असें (४) प्रार्थना करून राजांचे रक्षण करणें व युध्दांत जय मिळवून देणें हें पुरोहिताचें काम होतें.
९ब्रह्मवादिन् -- (ब्रह्माचें विवरण करणारा ). याचा अर्थ तै. संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत वेदांती असा होतो. ब्रह्मविद् ( शुद्ध स्वरूप जाणणारा ) याचाहि तोच अर्थ होतो तै. संहितेंत या शब्दाचा उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी यज्ञ प्रकरण चालू असल्यानें तेथें भाष्यकारांनी ' ब्रह्मविदा:=वेदार्थविचारका:' असा अर्थ केला आहे, व तो बरोबर दिसतो. तै. आरण्यक ब. छां. उप. यांमध्येंहि 'ब्रह्मवादिन्=वेदांन्ती' असा अर्थ नसून 'वेदार्थविचारक' एवढाच अर्थ प्रतीत होतो.
१०भागदुह् -- 'भाग देणारा,' 'वाटणारा' यजुर्वेद संहितेंत व ब्राह्मण ग्रंथ यांमध्ये राजाच्या एका रत्ना ( रत्निन् ) चें हें नांव आलेलें आहे. याच्याकडे काय काम होतें हें नीट समजत नाहीं. सायण काहीं ठिकाणी याचा अर्थ गोळा करणारा व शिल्पी असा करतो. याप्रमाणे तों या माणसाला व सुली कामगार असें समजतो. वा. सं. ३०,१३ मैत्रायणी संहितेंत 'रत्निन्' चा अनुक्रम असा दिला आहे. - ब्रह्मन्, राजन्, महिषी, परिवृक्ति, सेनानी, संग्रहिष्ट, क्षतृ, सूत, वैश्यग्रामणी, भागदुह्, तक्षरथकौरा, अक्षाबाप आणि गोविकर्त. प्रजेपासून राजाचा भाग वसूल करणारा असा याचा अर्थ आहे (तै ब्रा. ३. ४, ८, १ ). शिल्पी असा अर्थ कोठेहि आढळत ताहीं.
११भ्रूणहन् -- गर्भघाती, गर्भहन्ता. भू्रणहत्या 'गर्भघात' या शब्दांचा अर्थ एका गुन्ह्याचा वाचक असून त्या गुन्ह्यांचा अत्यंत निषेध तैत्तिरीय, कठ इत्यादि संहितांतून वारंवार केलेला आहे. हा अत्यंत भयंकर प्रकारचा गुन्हा असून त्याचें पातक कशानेंहि धुवून निघत नाहीं असें तेथें स्पष्ट म्हटलें आहे. उत्तरकालीन वाड्मयांतहि या गुन्ह्याचा निर्देष करतांना नापंसती दर्शविली जाते. याच एका गोष्टीवरून बापांना मुली नकोशा असल्या तर तो त्यांनां मरूं देत असत, ही गोष्ट अस्त्य व चुकीची आहे हें उघड दिसतें अथर्व. (६, ११२, ६). तेव्हां भ्रूणहत्या महणजे गर्भाची किंवा अशा माणसाची हत्या होय. त्रयी विद्येचें (तीन वेदांचें) ज्ञान असणारा ब्राह्मण तो भ्रूण असें तै. आ. २. ७, ३ येंथें म्हटलें आहे.
१२मनुष्य विश् मनुष्य विश आणि मनुष्य विशा -- या शब्दाचा अर्थ मनुष्य जात मानव असा तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण ग्रंथ दिला आहें.
१३यायावर -- यायावर याचा राहण्याचें ठिकाण नक्की ठरेंल नसलेला असा अर्थ यजुर्वेद संहितेत दिला आहें.
१४चाक्षुष -- हा शब्द फक्त अथर्ववेदांमध्यें एकदां आलेला आहे. सें. पी. कोशावरून असें दिसतें की, हा शब्द पित्याच्या नांवावरून बनलेलें नांव असावें. व्हिटनेच्या मते हा शब्द चक्षु: या शब्दाचें विशेषण आहें.
१५तायादर: -- तयादराचा असा या शब्दाचा अर्थ अथर्व वेदांत आहें.
१६ब्रह्मज्य -- ब्रह्मज्य म्हणजे ब्राह्मणांचा छळ करणारा व ब्रह्मज्येय म्हणजे ब्राह्मणांचा छल. हे दोन शब्द अथर्ववेदांत पुष्कळ वेळां येतात; व त्यांचा अर्थ अत्यंत नीच अपराध असा होतो. या अपराधाची शिक्षा अपराधी मनुष्याच्या नाशांत होते.
१७रथजूति -- अथर्ववेदांत ( १९. ४४, ३ ) हा शब्द विशेषणांत आलेला आहे. विशेषण व नाम या दोन्ही अर्थाने हा शब्द येतों. रथांत बसून वेगाने रथ नेणारा असा त्याचा अर्थ आहें.
१८श्रोत्रिय -- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ यामध्यें याचा अर्थ वेदविद्येंत प्रवीण, धर्मज्ञानी असा दिलेलां आहे.
१९मंजिष्ठा -- आधिक, जास्त वेडा हा शब्द ऐतरेय (३. २, ४) आणि शांखायन [ ८. ७ ] आरण्यक या ग्रंथातून आला आहें.
२०महाब्राह्मण -- 'मोठा ब्राह्मण' हा शब्द बृहदारण्यक उपनिषदांत आला आहे. ( २. १, १९, २२ ). आणि त्याचा अर्थ फारच वजनदार, महत्वाचा ब्राह्मण असा आहें.
२१ महाशाल -- ( मोठे घर असलेला ), मोठया घराचा स्वामी. हें विशेषण छांदोग्य उपनिषदांत अश्वपतीच्या तालमींत तयार झालेल्या ब्राह्मणांस लावीत असत ( ५. ११, १ ). अर्थात हें त्याचें महत्व वाढविण्यासाठींच आहे.