प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  
             
पैतृकनामें( ॠग्वेद)
ॠग्वेदात येणा-या पैतृक नावांसंबंधी माहिती पूर्वी दाशराज्ञयुद्ध या प्रकरणांत येऊन गेली असल्यामुळें त्या शब्दावर येथें टीपा दिल्या नाहींत.

पैतृकनामें( ॠग्वेद)
 अश्व्य  त्रैवृष्ण  मानव
 अग्निवेशि  दैववात  मारुताश्व
 आतिशिग्व  दैवोदासि  वार्षगिर
 आथर्वण  दौर्गह  वायत
 आर्क्ष  नाहुष  वैतरण
 आर्चत्क  पज्रिाय  वैदथिन्
 आर्ष्टिषेण  पार्थ्य  वैददश्वि
 ऐल  पौतक्रत  वैन्य
 औलान  पौरुकुत्सि  शातवनेय
 औशिज  पौरुकुत्स्य  शार्यात
 कौरयाण  प्रातर्दनि  सांवरण
 जाहुष  प्रैयमेध  सार्ञ्जय
 तौग्रय  प्लायोगि  साहदेव्य
 त्रासदस्यव  भारद्वाज  सुकृत्वनि
(तै.स.)
 १वैशीपुत्र
 (अथर्ववेद)
 २वैतहव्य
 (संहितेतर)
 ३ऐतरेय


वैशीपुत्र - वैश्यस्त्रीचा मुलगा. हा शब्द तैत्तिरीय संहिता (३,९,७,३) व शतपथ ब्राह्मणांत (१३,३) आला आहे.
वैतहव्य- एका ब्राह्मणाची गाय मारून खाल्याबद्दल ज्या कुलाचा नाश झाला अशा कुटुंबांतील लोकांचें हें नांव अथर्ववेदांत उल्लेखिलें आहे. हे लोक सृंजय असावेत असें कांही विद्वानांचे मत आहे. पण वर दिलेली कथा याच रूपांत पुढें कोठें आली नाहीं. म्हणून वरील  विधानाच्या सत्यतेबद्दल संशय आहे.  झिमरच्या मतानें वैतहव्य हें सृंजयांचें नुसतें विशेषण आहे. पण ज्या अर्थी वीतहव्य या नांवाचा मनुष्य होऊन गेला त्या अर्थी झिमरचें हें मत संभाव्य नाहीं.
ऐतरेय- बहुतेक हे इतर या शब्दापासून झालेलें पैतृक नांव असावें. परंतु टीकाकार सायण म्हणतात कीं, हें इतरा या स्त्रीपासून झालें असावें. ऐतरेय आरण्यक व छांदोग्य उपनिषद्  यांत हें महिदासाचें विशेषण म्हणून आलें आहे.