प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि

 ध्वजनामें ( ऋग्वेद )
 अक्र  केतु  बृहत्केतु
 कृतध्वज   १ध्वज  सहस्त्रत्केतु
 सुत्केतु

ध्वज -- ऋग्वेदांत लढाईत वापरलेल्या निशाणाच्या अर्थानें हा शब्द दोनदां आलेला आहे. ज्या दोन ठिकाणीं हा शब्द आलेला आहे त्या दोन्ही ठिकांणीं 'योध्दे निशाणांवरहि बाण सोडून तीं पाडण्याचा ( शत्रुसैन्यांत गडबड उडावी म्हणून ) प्रयत्न करीत असत' असा उल्लेख आलेला आहे. ही वैदिक काळच्या लढण्याची विशिष्ट त-हा लक्षांत ठेवण्यासारखी आहे. ऋग्वेद १०.१०३,११ या ठिकांणी येणा-या ध्वजेषु या शब्दासंबंधी सायण भाष्यांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. 'अस्मांक सम्बन्धिनेष्वेव परसेनां संप्राप्तेषु ध्वजेषु ध्वजवत्सुं सैनिकेषु इंद्रो रक्षिता भवतु' इ. ग्रिफिथ ध्वज याचा अर्थ निशाण असाच देतो.