प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

इराणी पौराणिक कथा - या दंतकथा इराणमध्यें त्याच्या इतिहासाच्या प्रत्येक काळीं होत्या. झरथुष्ट्र व इस्लाम या धर्मांनीं देखील यांचें उच्चाटन केलें नाहीं. झरथुष्ट्री संप्रदायाने या दंतकथांतील जुन्यां देवता व वीर पुरुष यांनां व्यवस्थित व निश्चित स्वरूप देऊन त्यांनां अहुर मझ्दचे धार्मिक मदतगार व सेवक बनविलें. याच काळांत कथांची पुनर्रचना व विस्तार झाला.