प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
इराणी पारमार्थिक विचार व संस्कृति - इराणी व हिंदू या लोकांचे मूळ पूर्वज जे आर्यन् लोक त्यांच्या वेळीं या दोन्ही लोकांचा एक प्रकारचा ठराविक स्वभाव व लक्षणें होतीं. आतां देखील या दोन्ही प्रकारच्या लोकांचा धर्म, देवतांचीं नांवें, दंतकथा वगैरे बाबतींत विलक्षण साम्य दिसून येते. तें मागें दुसर्या आणि तिसर्या विभागांत सविस्तर दिलेंच आहे.