प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
दक्षिण रशिया - काळ्या समुद्रावर असलेल्या ग्रीक वसाहतीमुळें कलाकुसरीच्या बाबतींत तरी सिथियन लोकांवर ग्रीक संस्कृतीची छाप पडलेली होती हें तेथील जमिनींत सांपडलेल्या वस्तूंवरून दिसून येतें.