प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

थीबीचें धुरीणत्व - ल्युक्ट्राच्या लढाईनें पुढारीपणा स्पार्टाकडून निघून थीबीकडे गेला. परंतु थीबी लोकांजवह अथेनिअनांप्रमाणें पैशाचें सामर्थ्य नव्हतें किंवा स्पार्टाप्रमाणें अद्वितीय लष्करी सामर्थ्यहि नव्हतें. आरमार तर त्यांच्याजवळ मुळींच नव्हतें; किंवा लोकशाहीसारख्या एखाद्या उच्च राजकीय तत्त्वाचा त्यांनां पाठिंबा नव्हता. यामुळें सर्व बाजूंनीं त्यांनां लवकरच अपयश येत गेलें.