प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
अलेक्झांडरपासून रोमन अंमलापर्यंत (ख्रि. पू. ३३६-१४६) - या काळांत मागील नगरराज्यपद्धति मागें पडून सांघिक राज्यपद्धति चालू झाली. या वेळीं इटोलिअन व आकिअन असे दोन प्रसिद्ध संघ होते; व आधुनिक काळांतील प्रातिनिधिक तत्त्व अंमलांत येऊन संघांतीलसंस्थानांतर्फेच्या प्रातिनिधींच्या हातांत खरी राज्यसत्ता होती.