प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

अलेक्झांडरनंतरच्या ग्रीक संस्कृतीचें स्वरूप - अलेक्झांडरनें हिंदुस्थानपर्यंत देश जिंकून जीं नवीं नगरें वसविलीं त्यांनीं हेलासची मर्यादा हिंदुस्थानपर्यंत विस्तृत केली, व अशा रीतीनें ग्रीकांच्या ताब्यांतील प्रदेश विस्तीर्ण झाल्यामुळें जुन्या गुरुत्वमध्यांतहि साहजिकच पुष्कळ फरक झाला. या नवीन परिस्थितीमुळें ग्रीक संस्कृतीमध्यें कोणते फरक घडून आले तें पहाणें महत्त्वाचें आहे.