प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
भागवत धर्माचे आधार - भागवतधर्माचा मुख्य आधारभूत पाया म्हणजे पंचरात्र संहिता हा होय. ब्रह्मसुत्रें २.२, ३९-४२ यांवरील आपल्या भाष्यांत रामानुजाचार्यांनीं यांपैकीं कांहीं संहितांतून आधार घेतले आहेत. त्या संहिता म्हणजे पौष्कर-संहिता, सात्वतसंहिता व परमसंहिता या होत. चतुर्विध आत्म्याची ब्राह्मण नेहमींच्या चार (वासुदेव संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध) नांवांनीं पूजा करतात तेव्हां ते प्रमाणभूत मानलें जावें असें सांगण्यांत पौष्कर संहितेंतून आधार घेतला आहे. सात्वतसंहिता सध्यां छापून तयार असून सर्वांस उपलब्ध आहे. या संहितेचा सारांश येणेप्रमाणें आहे:-