प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बौद्ध संप्रदायाचा प्रसार.- बौद्ध संप्रदायाचा उत्तर हिंदुस्थानांत प्रसार त्याच्या काळांतच झाला. ब्रह्मावतीच्या पश्चिमेकडे गौतमानें स्वतः चोहोंकडे संचार केला होता. तो संचारसंबंध द्यावयाचा म्हणजे त्याच्या अनेक सूत्रांचा परामर्श घ्यावा लागेल. हा पुढें बौद्धवाङ्मयाच्या विवेचनाच्या प्रसंगीं घेतला जाईल. सध्यां मतस्थैर्यार्थ झालेल्या धर्मसभा व निरनिराळ्या प्रदेशांत झालेला संप्रदायप्रसार इकडेच लक्ष देऊं.