प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धाच्या इतिहासांतील महत्त्वाच्या गोष्टींचा कालनिर्णय.- तेव्हां आतां बिगंडेट्सच्या पुस्तकांतून घेतलेल्या तिथींनां पुढें दिल्याप्रमाणें तारखा लावण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं:-

ईत्झन शक प्रचारांत आला:- रविवार ता. ५ मार्च ६२६ (ख्रि. पू.)
बुद्धाचा जन्म:- शुक्रवार ता. ४ एप्रिल, ५५७ (,,)
त्याचा गृहत्याग:- रविवार ता. २२ जून ५२९ (,,)
ज्ञानप्राप्ति:- बुधवार ता. ८ एप्रिल ५२२ (,,)
शुद्धोदनाचें निधन:- शनिवार ता. २० जुलै ५१८ (ख्रि. पू.)
बुद्धाचें निर्वाण:- मंगळवार, ता. १ एप्रिल ४७८ (ख्रि. पू.)
निर्वाणशकारंभ:- रविवार ता. १९ जानेवारी ४७८ (ख्रि. पू.)