प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

पुराणेतर ऐतिहासिक साहित्य व तन्मूलक इतिहास.- हा काय व किती जुन्या काळपर्यंत सांपडतो तें पाहूं. निरनिराळ्या घराण्याचें कांहीं धागे जोडतां आले आहेत. ते जोडण्याचे जे दोन महत्त्वाचें प्रयत्न झाले आहेत ते त्यांच्या फलांसह देतों.