प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
पाली धर्मशास्त्रांतील सुत्तपिटक.- ज्याप्रमाणें विनयपिटकावरून आपणांला संघाची म्हणजे प्राचीन बौद्ध संप्रदायांतील व्यवस्था व बौद्ध भिक्षूंची दिनचर्या यांबद्दल माहिती मिळते त्याप्रमाणें सुत्तपिटकावरून धम्माची म्हणजे बुद्ध व त्याचे प्रथम शिष्य यांच्या परमार्थसंप्रदायाची माहिती मिळते. सुत्तपिटकांतल्या गद्य कथांत व संवादांत आणि सुभाषितांत व गीतांत बौद्धांचें तत्कालीन वाङ्मय ग्रथित झालेलें आहे.