प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

पटिसंभिदामग्ग.- हा अभिधम्म वाङ्‌मयापैकीं एक ग्रंथ आहे. या ग्रंथाला खुद्दकनिकाय यामध्यें स्थान मिळालें आहे यावरून खुद्दकनिकाय याचा कांहीं ठिकाणीं सुत्तपिटकाच्या ऐवजीं अभिधम्मपिटकामध्यें अंतर्भाव केलेला कां आढळतो. या गोष्टीचा खुलासा होतो. परंतु प्रस्तुत ग्रंथाच्या स्वरूपावरून तो अभिधम्मपिटकांतीलच दिसत असतांहि, त्याचा त्यामध्यें अंतर्भाव कां केलेला नाहीं, तें निश्चितपणें सांगतां येत नाहीं.