प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जगय

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

निद्देस.- निद्देस अथवा महानिद्देस हें सुत्तनिपाताच्या दोन भागांवरील टीकेचें नांव आहे. या टीकेला पाली धर्मशास्त्रामध्यें स्थान मिळण्याचें कारण, बहुधा इतर पाली टीकांच्या मानानें ती बरीच जुनी आहे हें होय.