प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
पठ्ठानपकरण व यमक.- पठ्ठानपकरण अथवा महापकरण, याचा दुकपठ्ठान या नांवाचा एकच भाग अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेला आहे. त्याप्रमाणेंच यमक (दुहेरी प्रश्न-म्हणजे यांतील सर्व प्रश्न अस्तिवाचक व नास्तिवाचक अशा दोन्ही त-हेनें विचारिलेले आहेत) या ग्रंथाचाहि फक्त पहिला भागच बाहेर पडला आहे.