प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

धातुकथा.- धातुकथा (पदार्थनिर्देश) हा अभिधम्मपिटकांतील दुसरा ग्रंथ आहे. या लहानशा ग्रंथामध्यें चौदा प्रकरणें असून त्यांत प्रश्नोत्तररूपानें सृष्टींतील पदार्थाचे चमत्कार व त्यांचीं निरनिराळी स्वरूपे यांचे वर्णन आहे.