प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
विभंग.- विभंग हा वरील ग्रंथास पुरवणीदाखल रचलेला आहे. धम्मसंगणींतील सुत्रें व पदार्थांचे वर्ग यामध्यें गृहीत धरले असून कांहीं नवीनहि घातले आहेत. पहिल्या प्रकरणामध्यें बौद्धांच्या मूलभूत कल्पना व मूलभूत सत्यें यांचें विवेचन आहे; दुस-या प्रकरणामध्यें इंद्रियजन्य ज्ञानापासून बुद्धाच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानापर्यंत सर्व ज्ञानांबद्दल विवरण आहे; तिस-या प्रकरणांत ज्ञानमार्गामध्यें येणारीं विघ्नें सांगितलीं आहेत; आणि शेवटच्या प्रकरणांत मनुष्य व इतर योनींतील निरनिराळ्या स्थितींचें काल्पनिक वर्णन आहे.