प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
डेन्मार्कची भाषा.- डेन्मार्कची आजची भाषा जुन्या स्कँडिनेव्हिअन भाषेपासून निघाली आहे. स्वीडनची भाषा याच भाषेपासून निघाली आहे.
आइस्लंड येथें जुनी स्कँडिनेव्हिअन थोड्याफार फरकांनीं आजहि वापरली जातें. ११०० पावेतों ही सर्व स्कँडिनेव्हियाची ग्रंथभाषा होती. डॅनिश भाषा या जुन्या स्कॅन्डिनेव्हिअनपासून दूर दूर जात चालली याचे कारण प्रथम लो जर्मन व नंतर हायजर्मन या भाषांचा तिजवर घडलेला परिणाम होय. १२ व्या शतकांत हा फरक नजरेस येऊं लागला डॅनिश भाषेच्या इतिहासांतील चार कालखंड पुढीलप्रमाणें पडतात. ११०० ते १२५० अतिप्राचान डॅनिश १२५० ते १४०० प्राचीन डॅनिश. १४०० ते १५३० जर्मन भाषेच्या परिणाम फार झाला. १५३० ते १६८० भाषेचा विकास पूर्ण झाला व आजची भाषा तयार झाली.
अतिप्राचीन डॅनिश भाषा विभक्ति प्रकारांच्या बाबतींत जुन्या स्कँडिनेव्हिअन भाषेपासून निराळी झाली व प्राचीन डॅनिशमध्यें सामान्यलिंग आलें, अनियमित उपपद तयार झालें, क्रियापद चालविण्याचे सोपे प्रकार तयार झाले वगैरे.
याप्रमाणें आजच्या डॅनिश भाषेची वाढ होत आहे.