प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
जर्मन भाषा - इंग्लीश व फ्रिजियन भाषांप्रमाणें जर्मन भाषाहि वेस्ट जर्मनिक भाषाकुलांतील आहे. याच कुलांतील लांगोबार्डिअन ही भाषा आहे. ही ९-१० व्या शतकांत लयास गेली. बर्गांडिअन भाषा ईस्ट जर्मानिक कुलांतील आहे. हिचे अवशेष ५ व्या शतकापावेतों सांपडतात, पुढें सापडत नाहींत. रोमान्स पोटभाषांनीं लांगोबर्डियन कार्डियन या भाषा लयास नेल्या. पश्चिम फ्रँक भाषहि याप्रमाणेच नष्ट झाल्या. ८४२ सालीं फ्रँक भाषाहि याप्रमाणेच नष्ट झाल्या. ८४२ सालीं फ्रँक लोक ''स्टांसबर्ग शपथांसाठीं'' रोमान्स भाषा वापरीत होते व 'लुई जर्मन', हा राजा त्यांजशीं याच रोमान्स भाषेंत बोलत होता असा दाखला आहे. 'डॉएश स्प्राश' ही पश्चिम जर्मानिक जातींची भाषा, ज्या जाती प्रथम पासून आज पावेतो जर्मानिक बोली बोलत आल्या आहेत त्यांची भाषा. या जातींत मुख्य जाती येणें प्रमाणें: सॅक्सन, फ्रँक, चट्टी, (हेशिअन), थुरीगिअन, अलेमानिअन, बव्होरिअन. लोकंट्रजिमध्यें बोलल्या जाणा-या फ्लेमिश व डच भाषा या वरील सदरांत येतात परंतु या भाषांचा उत्तरकालीन विकास जर्मनवर अवलंबून झालेला नाहीं. म्हणून त्यांचा विचार येथें नको.
जर्मन भाषा बोलणारे ७१० लाख लोक आहेत. यूरोपीय भाषांमध्यें हिचा क्रम तिसरा लागतो. हिच्या प्रदेशाला पश्चिम व दक्षिण दिशेला रोमान्स भाषाप्रदेश (फ्रेंच इटालियन) व कांहीं अशीं स्लॅव्हॉनिक भाषाप्रदेश लागून आहे. पश्चिमेकडे व दक्षिणेकडे जर्मन भाषा पूर्वकाळापेक्षां हल्लीं कमी प्रचारांत आहे. तिची जागा थोडीफार रोमान्स भाषांनीं घेतली आहे. फ्रेंच फ्लँडर्स, अल्सेस व लोरेन या प्रांतांत वरील प्रमाणें स्थिति आहे. माँटे रोझा, दक्षिण टायरोल, कारिथिया येथेहि रोमान्स भाषांचे वर्चस्व आहे. पूर्वकडे चार्लस दि ग्रेटच्या वेळेपासून आधुनिक काळापर्यंत जर्मन भाषा सारखी प्रसार पावली. अलीकडे पात्र बोहिमिया, मोरेव्हिया व लिव्होनिया येथे तिचा फार कमी झाला आहे. चार्लसच्या वेळेला पूर्व मर्यादा लोअर एल्ब नदी साल नदी बोहीमियाचे जंगल व एन्सनदी याप्रमाणें होती. बोहीमियाकडे १३ व्या शतकांत, सायलेशियाकडे थोडी अगोदर व लिव्होनियाकडे १३ व्या शतकांत याप्रमाणें जर्मनचा प्रचार जर्मन वसाहतवाल्यांकडून आला. प्रशियनांचा मुलूख याच सुमाराला ट्यूटॅनिक उमरावांनीं घेतला. व तेथें त्यांनीं वसाहत केली. उत्तरेकडे चार्लसकडे चार्लसच्या वेळेला आयडर ही जर्मन-भाषा-प्रदेशाची सीमा होती ती पुढें सरकून डॅनिश भाषा-प्रदेशांत जर्मनचें वर्चस्व सारखें वाढत आलें आहे.
८ व्या व ९ व्या शतकांत जर्मन अथवा डॉएश ही प्रथम ग्रंथभाषा म्हणून सांपडते. ही ग्रंथभाषा ओल्ड हाय जर्मन व ओल्ड लो जर्मन या स्वरूपांत सांपडते. या दोन भाषांची जननी कोणती तरी पूर्व जर्मन भाषा असेल, परंतु तिचा थांग लागत नाहीं. जर्मन भाषेचा इतिहास विभागून त्याचे तीन काळ कल्पिले आहेत : (१) ओल्ड हाय जर्मन, ओल्ड लो जर्मन यांचा काळ; (२) मिडल हाय जर्मन, मिडल लो जर्मन; (३) मॉडर्न हाय जर्मन, मॉडर्न लो जर्मन. हाय व लो जर्मन हे जर्मन भाषेचे विभाग ज्या वर्णविषयक क्रियेमुळें पडले ती क्रिया ६ व्या शतकांत सुरू झाली. लो जर्मनचा प्रदेश म्हणजे उत्तर जर्मनी व हाय जर्मनचा प्रदेश दक्षिण जर्मनी. इ. स. ११०० पावेतों पहिला भाषाकाळ इ. स. १५०० पावेतों दुसरा व तदनंतरचा तिसरा असें मानावयाचा सामान्य प्रघात आहे.
जर्मन भाषाप्रदेशांतील पोटभाषा:-