प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.         

सामप्रवर्तक ऋषी व त्यांच्या सामपद्धतींतील शाखांतरें-  आतां प्रत्यक्ष सामवर्तक ऋषी कोणकोणते होऊन गेले व त्यांच्या सामपद्धतीत शाखांतरे काय झालीं याविषयीं जमलेली माहिती येथें देतो.

वंशब्राह्मणांतील सामविद्येसंबंधी शिष्यपरंपरा.

राधगौतम या ॠषीपासून पुढें दोन निरनिराळया शिष्यपरंपरा निघतात.  यापैकी पहिल्या परंपरेतील अंशुधानंजय यानें आपली विद्या राधगौतम व अमावास्यशाण्डिल्यायन या दोन ॠषींपासून संपादन केली होती.  मात्र हा आमावास्य शांडिल्यायन कोण होता व त्याने आपली विद्या कोणापासून संपादन केली होती याबद्दल माहिती या ब्राह्मणांत आढळत नाही.  दुसरी शिष्यशाखा राधगौतम याचा शिष्य गौभिल याजपासून सुरु होते व तीत पहिले आठ पुरुष गौभिल गोत्रीच दिसतात.

 पहिला शिष्यशाखा

कात्यायन श्रातैसूत्रांत उल्लेखिलेले सामवप्रर्तक ॠषी.

कौत्स राणायनीपुत्र
क्षैर कलंभि लामकायन
गार्ग्य वैयाघ्रपाद
गौतम शांडिल्य
धानंजय शांडिल्यायन
भांडितायन शौचिवक्षि
मशक स्थविरगौतम


लाठयायन श्रौतसूत्रांत उल्लेखिलेली शाखांतरे

अहरावर्तकारी वाजसनेयकम्
कुत्सा: शाठयायकम्
पुराणतांड शाठयायनी
मासावर्तकारी शालंकायनी
रौरुकी सांवर्ग्यजित गौतम
लामकायन


द्राह्यायण श्रौतसूत्रांत उल्लेखिलेले सामप्रवर्तक ॠषी.

कौत्स वार्षगण्य
क्षैरकलंभि वैयाघ्रपद्य
गौतम शाण्डिल्य
धानंजय शाण्डिल्यायनि
राणायनीपुत्र शौचिवृक्षि
लामकायन स्थविरगौतम



द्राह्यायण श्रौत्रसूत्रांत उल्लेखिलेली शाखांतरे.

उपसर्गिण रौरिकिण:
पुराण तांड शाठयायनि:
भांडितायन शालंकायनिन:
भाल्लवि संकृतिन:
माषशरावय