प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 

सात स्वराची प्राचीन सामरुपी प्रत्यक्षात व्यापकता.– रत्येक ‘साम’सात स्वरांनी गाइलें जाई असे दिसत नाही.  कोणत्या तरी एका स्वरामध्यें सामाचा प्रारंभ होऊन साम समाप्त होईपर्यंत दोन दोन किंवा तीन तीन स्वर किंवा त्याहूनहि कमजास्त स्वर चढ उतार करुन गाण्यांत येत असावेत असें दिसते.  सातहि स्वरांचा उच्चार होणारींहि सामे काहीं काहीं आहेत.

सामगायनात स्वर किती व कशा क्रमाने गाइले जात याविषयी कल्पना येण्यासाठी काहीं उतारे पुढे देतो.


गोतम-पर्क्क

ओग्ना इ । आयाही ३ वीइतोया रइ । तोया रइ । गृणानोह । व्यदातोया रइ । तोया रइ । नाईहोतासा २३ । त्सा२इ । वा २३४ औहोवा । ही २३४ षी ॥ १ ॥

वर दिलेले साम हे ‘चतुर्थ स्वरादि’म्हणजे चतुर्थ स्वरांत आरंभिले जाणारे असून या सामांत एकंदर पांच स्वर गाइले आहेत.

कश्यप-बर्हिष्य

अग्ने ओयाहिवी । तयाइ । गृणोनोहेव्यदाता । २३ याइ निहोतासत्सिबर्हा २३ इषि । वर्हा२इषा २३४ आहोवा बर्ही ३ षी १/२ १/३ ग्न १/५ ॥ १  ॥

या सामाचा प्रारंभ चतुर्थ व मंद्र या दोन स्वरांनी यथाक्रम होत असून यामध्ये एकंदर पांच स्वर गाइले आहेत.

( गाथिन: ) कौशिक – साम

अदशि गातुवित्तमा ६ ए । यास्मिन व्रतानि यादधु: । ऊपोषुजा ३ । हा ३ हा इ । तमारि यस्य वर्धनम् । अग्नाइन्नक्षा ३ । हा ३ हा । तुनो गिर : । इडा २३ भा ३४३ ओ २३४५ इ । डा ॥ १३ । ४७  ॥

या सामाचा प्रारंभ मंद्र (५) अति मंद्र (६) व मंद्र (५) या स्वरांनी यथांक्रम झालेला असून यामध्यें एकंदर ६ स्वर गाइलेले आहेत;

१.ब्रह्मा, प्रजापति किंवा विश्वदेव, २ आदित्य, ३ साध्य, ४ अग्नि, ५ वायु, ६ सोम व ७ मैत्रावरुण ह्या अनुक्रमे क्रुष्टादि-सप्त-स्वरांच्या देवता म्हणून वर्णिल्या आहेत.

आतां या वरील सामांतील स्वरलेखनपद्धति कशी काय होती व त्यांतील निरनिराळया चिन्हांचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करुं.