प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
वैदिक गानकाव्ये.– वैदिक संगीतपद्धतीचे स्पष्टीकरण करतांना गाण्याकरतां रचलेली काव्यें किंवा काव्यांत गाण्यासाठी उपयोगी करण्यासाठीं केलेले फेरफार यांच्याकडे लक्ष दिल्याशिवाय पुढें जाणे बरे नाही.  यासाठी वैदिक स्तोमांचे विवरण केलें पाहिजे.