प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
वाङ्मयमूलक शास्त्रांचा संहितीकरणांपासून विकास:- आज कोणत्याहि देशांतील भाषेचा, म्हणींचा किंवा परंपरागत समजुतीचा अभ्यास करावयाचा झाल्यास अर्वाचीन संशोधक ज्या क्रिया करतो त्याच क्रिया भारतीय वाङ्मयाच्या इतिहासांत झालेल्या आढळून येतात. वेदाच्या निरनिराळ्या संहिता बांधल्या गेल्या त्यांतच अव्यवस्थित ज्ञानाच्या शास्त्रीकरणाची पहिली क्रिया झाली. वेदांगे आणि दर्शने उत्पन्न करण्याची दुसरी क्रिया त्यानंतर त्या साहित्याचा अधिक अभ्यास झाल्यामुळें उत्पन्न झाली. या दोन्ही क्रिया प्रस्तुत प्रकरणांत स्पष्ट करण्यांत येत आहेत.