प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
मोंगलाईच्या अखेरच्या काळांतलें संगीत.- शौरींद्र मोहन ठाकूर (सर एस्. एम्. टागोर) यांच्या मताप्रमाणे, ज्याच्या दरबारीं चांगले उत्तम गवई होते असा शेवटचा बादशहा महमदशहा हाच होय.  त्याच्या पदरी आदरंग आणि सादरंग हे दोन सुप्रसिद्ध बीनकार होते.  याच काळांत शोरी या गवयानें ‘टप्पा’ हे हिंदुस्थानी पद्धतीतील गाणें पूर्णपणें सुधारले.  याशिवाय कांही नवीन पद्धतीचींहि गाणी या वेळी प्रचारांत आली.  ती हिंदी आणि पर्शियन या दोन पद्धतींच्या मिश्रणाने तयार झालेलीं होती.