प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.    

मराठी वृत्तें- मराठीत संस्कृत वृत्तें घेतली जातात तरी मराठींत प्राचीन काळापासून मात्रा गण वृत्ताकडे किंवा अक्षरमान छंद:शास्त्राकडे लक्ष देऊन काव्यें करण्याचा प्रघात आहे. मराठीतील वृत्तें येणें प्रमाणें.

मराठी वृत्तांचें कोष्टक.

याशिवाय सवाई हें वृत्त मराठींत आहे तें आचार्यांच्या चपटपंजरांशी सद्दश आहे. मरहट्टा उर्फ   महाराष्ट्र म्हणून प्राकृत पिंगलांत वृत्त आहे तें सवाईसारखेंच आहे.

मराठींत सामान्य जन कटाव,पदें,लावण्या वगैरे करतात त्यांचा छंदोद्दष्टया विचार फारसा झाला नाहीं तथापि प्रोफेसर माधव त्रिंबक पटवर्धन यांनी थोडा प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाचे फल त्यांनीं विस्तारांत मे १९२२ दिलें आहे. या लेखांत मुख्य अर्वाचीन पदें घेऊन २७ वृत्तें बसविलीं आहेत ती येणें प्रमाणे:या ठिकाणीं - खूण गुरू अक्षर दाखविते पण या गुरूबद्दल दोन लघु अक्षरें आली तरी चालतात. + हें चिन्ह शुद्ध गुरू अक्षर दाखवितें व   , चिन्ह लघु अक्षर दाखवितें.

'मनोरम' हा त्यांनी एक आठ मात्रांचा नवीन गण कल्पिला आहे त्याचे मुख्य प्रकार येणेंप्रमाणे:- क-गण ;ख-गण  ग-गण घ-गण   ड-गण  इ.गण  क्कचित् येतो,म्हणतांना तो अडथळा करतो व मूळ चालींत फरक करतो म्हणून तो सदोष समजावा.

(१)स्वंर्गगा किंवा फटका- [॥ क्ष। क्ष।क्ष।  ] तीन 'मनोरम' गण व एक मगण मिळून या वृत्ताची एक ओळ तयार होते. मगणाऐवजी   असा लघुगुरूक्रम आला तरी चालतो. वर सांगितल्याप्रमाणे (-)ही खूण ज्या गुरूच्या दोन लघु आले तरी हरकत नाही असा गुरू दाखविते.(+)ही शुद्ध गुरूची खूण आहे.(॥... ॥) ही खूण ओळींची लांबी दाखिवते (क्ष)ही खूण 'मनोरम' गण म्हणजे कखगघड.यांपैकीं कोणताहि गण तिथें बसतो हें दाखविते.या वृत्तांत ''भीमक बाळा म्हणे नृपाळा बिकट वाट वहिवाट नसावीo'' ''दो दिवसांची तनु हे साची''वगैरे पदें आहेत.

(२) बालानंद.- हें वृत्त अत्यंत सुलभ आहे. एक'मनोरम' गण व एक मगण मिळून बालानंदाची एक ओळ तयार होते. केशवस्वामींची 'तारकदिक्षा' वगैरे अनेक पदें व शिवदिनकेसरीचें''दैवें नरतनु सांपडली''वगैरे पदें या वृत्ताची आहेत.

(३) साकी किंवा सरवाहिनी [॥ क्ष। क्ष। क्ष। +॥] तीन मनोरम गण व नंतर चार मात्रांचा एक गण मिळून सरवाहिनी वृत्ताची एक ओळ होते. असें एक युग्मक व नंतर ॥ क्ष। +॥- -। क्ष। +॥अशा दोन समयक छोटया ओळींचे युग्मक मिळून एक शुद्ध साकी होते.

(४) चंद्रकांत आणि सुलभा [॥ क्ष। क्ष। क्ष। +॥] हें वृत्त फार जुनें व सुलभ असून 'चंद्रकांत राजाची कन्या'या पदामुळें फार लोकप्रिय आहे.

(५) सूर्यकांत किंवा राजसा [॥ क्ष। क्ष। क्ष। +॥] काहीं जुन्या कवितांतून सुलभा व राजसा या वृत्तांचे सरभेसळ मिश्रण केलेलें आढळतें. उदा. विनायकाची 'सोंगटीचा खेंळ' ही कविता किंवा प्रभारकृत 'लक्ष्मीपार्वती विनोद' इत्यादि.

सुलभा व राजसा ओळींत शेवटला भाग पुन्हा घोळून म्हणण्याचा एक प्रकार आहे व त्या पुनरूच्चाराच्या वेळीं जन हो, रे मना, सखे ग,वगैरे शब्द सहज म्हणण्यात येतात. त्यामुळें हया दिडक्या ओळीमुळें नवीन वृत्त होतें,त्याला उपचंद्रकांत व उपसूर्यकांत अशां नांवें देतां येतील.

(६) माधवकरणी उर्फ मधुरा- चंद्रकांत व उपचंद्रकांत मिळून हें वृत्त होतें. अंतरा असल्यास उपचंद्रकांताचा. याचे पृथक्करण उदा. प्रेम तुझे मजवर नाहीं हें सखे जाणतों मी ॥ नको तूं मला पुन्हां सांगूं ॥  

(७) मेनका- उपचंद्रकांतांची तोकडी ओळ आधी व चंद्रकांताची नंतर असा क्रम घातला म्हणजे 'वसंती बघुनि मेनकेला'या पदाचें'मेनका' वृत्त तयार होते.

(८) केशवकरणी उर्फ सुरा  खूण ज्या ठिकाणी आहे तेथें य गण अगर रगण अगर दोन गुरू आले तरी चालतील असें समजावें उदा. ''भला जन्म हा तुला लाभला''वगैरे राम जोश्याच्या लावण्या.'वीरा भ्रमराo' वीर शिरोमणीo' वगैरे पदें लिहून अण्णा किर्लोस्करांनी ही चाल रंगभूमीवर आणली.

(९) राजहंस उर्फ रसतरंगिणी  [॥ - । क्ष। +॥] उदा. ''उद्धवा शांतवन कर जा'' ''राजहंस माझा निजला''या पदानें हे वृत्त फार लोकप्रिय झालें आहे.

(१०) हंसा राणी [॥ - । क्ष। ++॥] उदाo देवलांचे 'श्रीमंत पतीची राणी'हें पद.

(११) शारद  किवा   उदादृ''घरिं मुलें॥तशी हीं फूलें॥ हूड वत्सलें॥लोचनें बघणें ॥ १॥

[१२] नृपममता. रसतरंगणीच्या प्रत्येक युग्मका नंतर एक रगणवजा तोकडी ओळ; शारद अंतरा व त्यामागून एक रसतरंगणीची ओळ मिळून ' नृपममता'वृत्त तयार होते. उदा. 'या पुढे'व 'स्वप्न'या विनायकाच्या कविता.

[१] भूमति वैभव [॥ - । क्ष। क्ष। - +॥].उदा. 'भूपती खरे ते' हें देवलांचे पद.

[१४] अक्रूर किंवा शमनी  उदा. 'अजि अक्रूर हा.'

[१५] मुद्रिका   उदा. 'मुद्रिके राम टाकुनी अलिस तूं कशी.'

[१६] पादाकुलक[॥ क्ष। क्ष। ॥] उदा. श्रीशंकरा चार्यांचे चर्पटपंजरिका स्तोत्र,केशवसुताचे 'सतारीचे बोल' पादाकुलकाच्या तीन ओळी व चवथी ओळ ॥ क्ष। +॥ मिळून अंजनीगीत होतें.

[१७] वधूवल्ली [॥X। - + ॥ - । क्ष। - +॥]. अंतरा पादाकुलक वृत्तांत असतो. उदा. एकनाथाचें ''गाफल हूवा''तुकारामाचें 'स्वस्थ बसावें',शिवदिनकेसरीचें'भाव धरारे'.

[१८] देवला   उदा. मृच्छकटिकांतील'जरि नाहीं कमल तें करीं'

[१९] म्हतारा[॥ क्ष। +॥X। क्ष। +॥] उदा. 'तें माझा यजमाना रामा: ''म्हातारा इतुका न.'

[२०] माळीण [॥ -। +॥X। क्ष। +॥ - । क्ष। क्ष। क्ष। +॥]अंतरी मंजरी  उदा. 'माळिण नव तरणी', 'तरूण कुलीन गोरा'.

[२१] पन्ना उदा. 'रूचती कां तीर्थयात्रा',' शैवाले युक्त जैसें पंकज तें शोभतें.'

[२२] पंचकल्याणी   मूळ चाल 'पंच कल्याणी घोडा अबलख'या लावणीची आहे. उदा. 'सुटला पितृदिशेचा वारा' हें देवलकृत पद.

[२३] आर्द्रा  अंतरा तीन ओळी पादाकुलकाच्या; चौथी पादाकुलकच. उदा. ''मज गमे ऐसा जनक तो। मांग साचा॥'' इत्यादि.

[२४] घुंगुरवाळा;   उदा. गोंविदाग्रजाचें 'घुंगुरवाळा' हें पद. तुकारामाचें' खेळ ग फुगडी' हें पदं.

[२५] कृष्णाकोयना  माधवानुजाच्या 'कृष्णाकोयनांचा संगम'या लोकप्रिय कवितेचें हें वृत्त आहे.

[२६] कुसुमगंधा[॥ - -।क्ष। + ॥ क्ष। क्ष। क्ष। +॥]. उदा. देवलकृत' मधुर किती कुसुम गंध सुटला. 'किर्लोस्करकृत' खचित बाई व्यर्थ अम्ही अवला.'

[२७] कबीर या फटका उर्फ स्वर्गेगा वृत्तांत युग्मकें]'सबसे राम भजन करलेना'या कबीराच्या पदाच्या वृत्तालाच 'कबीर' हे नाव दिलें आहे.ही चाल रा.आनंदराव टेकाडे यांनी पुढें आणली पण त्यांनी या वृत्ताची ओढाताण फार केली आहे त्यांच्या 'स्वैर विचार', 'हे भारतीय समशेरी' वगैरे कविता या वृत्तांत आहे.

मराठी छंद:शास्त्रास जें थोडें निराळें स्वरूप आलें त्याचे एक कारण येंथे दिले पाहिजे.

मराठी कवितेंत अक्षरगणवृत्तें फारशीं उपयोगांत आलीं नाहींत. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास, श्रीधर, मुक्तेश्वर, महिपति वगैरे मोठमोठया कवींनीं देखील ओवी अभंगासारख्या वृत्तांचा आश्रय केला. अक्षरगणवृत्ताचें ओझें फार  मोठें होऊं लागलें.संस्कृत ग्रंथकारांपेक्षां मराटी ग्रंथकारांवर एक ओझें जास्त पडलें होतें.संस्कृत कविता निर्यमक होती. मराठी श्रोत्यांचा वर्ग सयमक कवितेस चटावलेला होता. त्यास निर्यमक कविता आवडेना तेव्हा अक्षरगणवृत्ताकडे दुर्लक्ष करणें मराठी कवींना प्राप्त झालें. असो आतां तौलनिक छंद:शास्त्राकडे आणि चिनींतील छंद व संगीत यांच्या स्वाभाविक संयोगाकडे वळूं.