प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
ब्रिटिश अमदानींतील संगीताचा ऱ्हास.– ब्रिटिश आमदानीच्या आरंभीच्या काळांत हिंदी संगीतकला कांही प्रमुख हिंदी संस्थानिकांच्या दरबारामध्येंच कायती आश्रयाला होती.  कारण, ब्रिटिश मुलखांतील यूरोपियन अधिकाऱ्यांना हिंदी संगीत शास्त्रहीन आणि रानटी प्रकारचें वाटत असे.  तथापि सर बुल्यम जोन्स व सर डल्ब्यू औसले यांच्या सारखे कांही विद्वान आणि कॅपटन् डे व कॅपटन् विलर्ड यांच्या सारख्या कांही संगीतप्रेमी लोकांनी हिंदी संगीताचा बराच अभ्यास केला होता.  मुंबई इलाख्यात क्लेमंट्स यांचे नांव यूरोपीय अभ्यासकांत प्रामुख्याने  घालतां येईल. इंग्लडंमध्ये भारतीय संगीतासबंधाने  ज्यांनीं माहिती पसरविली त्यांत मि. फाक्स स्ट्रांगवेज, आणि मिसेस म्यान (मिस माड म्याकार्थी) यांच्या नांवांचा निर्देश केला पाहिजे.