प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

पिंगलापासून अर्वाचीन कालापर्यंत संस्कृत- मध्यें असलेलीं वृत्तें.- पिंगलोक्त लौकिक वृत्तांपासून वृत्तारत्नाकरासारख्या अर्वाचीन ग्रंथांत उल्लेखिलेलीं वृत्तें फार मोठा विकास दाखवीत नाहींत. यासाठीं वृत्तरत्नाकरांतील सर्व वृत्तें घेऊन आणि तीं अकारविल्ह्यानें मांडून त्यांचें स्वरूप पुढील पानावरील कोष्टकांत दाखविलें आहे. पिंगलानें अर्वाचीन वृत्तांपैकीं किती वृत्तांचा उल्लेख केला आहे हें पुढील कोष्टकांत * अशा खुणेनें दर्शविलें आहे.

वृत्तारत्नाकरांतील आणि पिंगलग्रंथांतील छंदोज्ञान यांमध्यें फारसा फरक नाहीं; आणि अर्वाचीन अक्षरगणवृत्तें आणि थोडया अंशीं मात्रागणवृत्तें यांची घडी पिंगलाच्या वेदांगाच्या काळांतच बसली यांत शंका नाहीं.