प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
बोपदेवाचा संप्रदाय- हा संप्रदाय इतरांच्या मानानें बराच अर्वाचीन आहे. अर्थात् याचा मुख्य ग्रंथ जो मुग्धबोध त्यासंबंधानें अपौरूषेयत्वासारख्या कोणत्याहि आख्यायिका प्रचलित नसून, तो बोपदेव नांवाच्या खऱ्याखुऱ्या माणसानेंच लिहिला आहे असें मानितात.