प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                     

पर्युदास व प्रतिषेध:- नत्राचा धातूशीं किंवा प्रत्ययाशीं अन्वय केला असतां त्यास काय म्हणावयाचें यासंबंधीं संज्ञा लक्षणसहित पुढें दिलेल्या श्लोकांत आहेत.

पर्युदास: स विज्ञयो यत्र पूर्वपदेन नत्र ।
प्रतिषेध: स विज्ञेयो यत्रोत्तरपदेन नत्र ॥

उत्तरपद म्हणजे प्रत्यय. तत्भिन्न धातु हें पूर्वपद होय. नत्राचा पूर्वपदाशीं अन्वय करणें यास पर्युदास म्हणावयाचें आणि उत्तरपदाशीं अन्वय केल्यास त्यास प्रतिषेध म्हणावयाचें.