प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
पणिनीच्या अष्टाध्यायीवरील विवरणग्रंथ- पणिनीच्या अष्टाध्यायीची निरनिराळया स्वरूपांत जीं विवरणें पुढें झाली त्यांमध्यें 'रूपमाला'हे अग्रगण्य होय. सिध्दान्त कौमुदी, रामचंद्राची प्रक्रियाकौमुदी वगैरे ग्रंथ मागाहून झाले, यांची रचना जवळजवळ रूपमालेच्या धर्तीवरच आहे. प्रक्रियाकौमुदी या ग्रंथावर पुष्कळ टीका आहेत. यांपैकीं, विठ्ठलाचार्यांची प्रसाद ही टीका सर्वप्रसिद्ध होय. विठ्ठलाचार्यांचा काळ इ.स. १५२५ पेक्षां अधिक अर्वाचीन असेल असें दिसत नाहीं. प्रक्रियाकौमुदीवर शेषकृष्णाची प्रक्रियाप्रकाश नांवाची एका टीका आहे.