प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
नामधेय.- नामधेयांनांहि विशेष अर्थ असतो. परंतु तो केवळ विधीनें सांगितलेल्या विधानास फक्त एक तर्हेचें नियमन करणें यापेक्षां जास्त नसतो. उदाहरणार्थ, ‘उद्भिदा यजेत पशुकाम:’ या ठिकाणीं ‘उद्विद्’ हें याग-नामधेय आहे व त्यानें इतर यागांहून या यागाचा भेद व्यक्त होतो. हाच‘उद्भिद’ शब्दाचा या ठिकाणीं अर्थ आहे. हीच विचारसरणी ‘तदधीनत्वाद्यागविशेष सिद्धे:’ या ठिकाणीं दाखविली आहे