प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.          

जैनेंद्र व्याकरणाचे दोन पाठ- जैनेंद्र व्याकरणाचे दोन पाठ आहेत. एक अभयनंदी नांवाच्या टीकाकारानें स्वीकारिलेला पाठ. त्यांत ३०० सूत्रें आहेत. दुसऱ्या पाठांत यापेक्षां जवळजवळ ७०० सूत्रें असून शिवाय शब्दांचे कित्येक किरकोळ फेरबदल आहेत. हा पाठ शब्दार्णवचंद्रिका या टीकेचा कर्ता जो सोमदेव त्यानें स्वीकारिलेला आहे. ही टीका इ.स. १२०५ मध्यें लिहिली गेली असें त्याच्याच म्हणण्यावरून दिसतें. या दोहोंपैकीं, दुसराच पाठ अधिक खरा होय असें दाखविण  पुरावा प्रो.पाठक यांनीं जमविला आहे.