प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
चांद्र संप्रदायाच्या ऱ्हासाचें कारण- चांद्र संप्रदायाच्या ग्रंथांचा संग्रह एवढा मोठा असतांना हा संप्रदाय हिंदुस्थानांतून अजीबात नाहींसा झाला याचें मुख्य कारण, हा संप्रदाय विशिष्ट पारमार्थिक पंथासाठीं काढलेला होता हें होय. याचीं मतें बौद्ध संप्रदायाची असल्याकारणानें त्या संप्रदायाबरोबरच याचाहि लोप झाला असावा.तथापि तिबेटांत अजून सुद्धां या संप्रदायाच्या ग्रंथांचा अभ्यास जारीनें चालू आहे असें सांगतात.