प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
काशिकाकार जयादित्य व वामन- इतसिंग नांवाचा चिनी प्रवाशी, जयादित्य हा 'वृत्तिसूत्र'नांवाच्या ग्रंथाचा कर्ता होय असें म्हणतो. वृत्तिसूत्र व काशिका हे ग्रंथ एकच आहे असें साधारणत: मानलें जातें. काशिका ग्रंथ जयादित्य व वामन या दोघांनीं मिळून लिहिलेला आहे. इतिसंगानें जयादित्याचा मृत्यूकाल अजमासें इ.स. ६६० हा दिला आहे. वृत्तिसूत्र व काशिका हे ग्रंथ एकच हा समज खरा धरून चाललें तर काशिका ग्रंथाचा काळ इ.स. ६९० हाच असावा असें म्हणावें लागेल.