प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
कातंत्राचे उंपग्रंथ– दुर्गाचा ८८ आर्यांत लिहिलेला लिंगानुशासन नांवाचा ग्रंथ, उणादिपाठ व दुर्गसिंहाचा धातुपाठ हे ग्रंथ यांत येतात. या सदराखालीं येण्याजोगे फारसे ग्रंथ नाहींत, व जे आहेत त्यांतले बरेच अर्वाचीन आहेत. धतुपाठाची रचना चांद्रधातुपाठाला धरुन आहे. मूळ कालापधातुसूत्रें तिबेटी भाषेंत मात्र उपलब्ध आहेत असें सांगतात.