प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             

कांतत्र व्याकरणाचें स्वरूप- पाणिनीनें प्रचारांत आणिलेली कृत्रिम वर्णव्यवस्था काढून टाकून प्रातिशाख्यांतून आढळणारी मूळची सोपी परिभाषा कातंत्र व्याकरणांत स्वीकारिली आहे. अर्थातच पाणिनीय प्रत्याहारसूत्रांनां यांत फांटा मिळाला हें सांगावयास नकोच. यांत स्वर, व्यंजन, समान इत्यादि परिभाषा आलेली आहे. विषयाची मांडणी करतांना पाणिनीची कृत्रिम पद्धत टाकून देऊन विषयावर मांडणी करण्यांत आली आहे. ग्रंथ नवशिक्यांकरितां असल्यामुळें वैदिकप्रक्रिया, अपवादभूत नियम व तशाच तऱ्हेचे कठिण नियम यांनां यांत रजा मिळाली आहे.