प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
कातंत्र शाखा- या शाखेचें दुसरे नांव कौमार किंवा कालाप असें आहे. हेंव्याकरण मुख्यत:शिशुबोधार्थ लिहिलें असून पाणिनीच्या व्याकरणांत दोष, नवीन पारिभाषिक शब्द, कृत्रिम संज्ञा वगैरे ज्या विशिष्ट गोष्टी आढळतात त्यांनां यांत फांटा दिलेला आहे. वेवर म्हणतो की, प्राकृतावरून संस्कृत शिकण्याकरितां हें व्याकरण लिहिलेलें होतें व कात्यायनाचें पाली व्याकरण याच्याच आधारावर रचलेलें आहे [वेबरकृत भारतीय वाङमयाचा इतिहास, पृ. ५५७] जुनीं प्रातिशाख्ये व ऐंद्रसंप्रदायाशीं व तामिळ व्याकरणांशीं याचा संबंध डॉ.बर्नेल याने जोडला आहे त्या संम्बंधीहि उल्लेख मागें आलेलाच आहे [हाच विभाग पृ. १९५ पहा].