प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   

शब्दाच्या अर्थावर दुसर्‍या शब्दांच्या सान्निध्याचा परिणाम:-  शब्दांचें पृथक्करण केल्यांनंतर, दुसरा विचार म्हणजे तो शब्द ज्या इतर शब्दांशी संगत असेल त्यानें शब्दाचा अर्थ नियमित होत आहे काय हें पहाणें, किंवा दुसर्‍या शब्दाच्या सान्निध्यामुळें त्या शब्दाचें अर्थांतर होत आहे काय हें पहाणें होय.