प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.


प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.   

रूपकांचे भाषांतर —  प्रसंगी इंग्रजींत असें होतें की, एक शब्द रूपकात्मक असतो आणि त्यासन्निध दुसरा मूळ स्वरूपांत असतो. उदाहरणार्थ, "रेन्स ऑफ गव्हर्नमेंट" यांत अस्पष्ट रूपक आहे. अशा प्रंसगी आपण असा विचार करावा कीं, आपणांस रूपक ठेवावयाचें आहे किंवा नाहीं. मुळांतील उपमान काय व उपमेय काय ?  प्रस्तुत प्रंसगी वाहन हें उपमान होय व "गव्हर्नमेंट" म्हणजे शासनसंस्था हें उपमेय आहे. उपमेय शोधणें म्हणजे प्रकृतार्थ शोंधणें होय;  व आपणांस उपमेयाशीं म्हणजे प्रकृतार्थाशींच कर्तव्य आहे; तेव्हां भाषांतरकारापुढें आवडी निवडीचे खालील प्रश्न उभे राहतात:-

१. रूपकांश अजीबात काढून टाकावा काय ?

२. रूपक पर्ण करून भाषांतर करावें काय ?

३. रुपकांतील उपमा परकीय आहे काय, किंवा आपल्या वाचकांस दुर्बोध होईल काय ?

४. प्रस्तुत उपमानाच्या ऐवजी दुसरें उपमान घालून भांषातर करणें श्रेयस्कर होईल काय ?