प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण १ लें.
शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास.
भाषांतराची आवश्यकता आणि भाषांतरतत्त्वें:- भाषांतर करणें म्हणजे दोन भिन्न भाषा बोलणार्या व्यक्तीसं त्यांच्या सामुच्चयिक निरनिराळ्या इतिहासांमुळें एकाचें लिहणें दुसर्यास समजण्यास ज्या अडचणी उत्पन्न होतात त्या काढून टाकणें होय. ज्ञानाचे पात्रांतर पद्धतशीर करणें हे भावी जनतेचें कर्तव्य आहे. हें कर्तव्य ज्ञानकोशाच्या रचनेंत संपणार नाही आणि यामुळे ज्ञानकोशाच्या लेखकांपुढें ज्ञानपात्रांतराचे जे नियम मांडले ते सर्व लोकांस उपयुक्त होतील या हेतूनें प्रसिद्ध करीत आहों.