प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.

 
वर्णमालेची उत्पत्ति:-  प्राचीनांनी शास्त्रीय ज्ञानांत घातलेली सर्वांत मोठी भर म्हणजे भाषेंतील निरनिराळ्या ध्वनीचें पृथक्करण त्यापासून वर्णमालायुक्त लेखनपद्धति तयार केली ही होय. ही मजल गाठण्यापूर्वी प्राचीन लोक कोणकोणत्या अवस्थांतून गेले हें जाणण्यासाठीं आपणांस कल्पनाशक्तीचा उपयोग करून चित्रांच्या साहाय्यानें विचार व्यक्त करण्याचा प्राथमिक अवस्थेंतील लेखनपद्धतीचा कसकसा विकास होत असावा हें पाहिलें पाहिजे.