प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.          
 
पार्थियन राजांचे लेख:- पार्थियन राजे देखील शंकवंशीच असावे. ते पार्थियाकडून आले म्हणून त्यांनां पार्थियन म्हणतात. त्यांचें राज्य कंदाहार, सीस्तान, पश्चिम पंजाब व सिंध एवढ्या भागांत कमीजास्त होत राहिलें. त्यांच्याहि नाण्यांच्या दुसर्‍या बाजूस खरोष्टी लिपीतीलच अक्षरें आहेत [ गा. कॅ. कॉ, ग्री. सी. प्लेट २२-२३; व्हा. कॅ. कॉ. पं म्यू; पुस्तक १ प्लेट १५-१६. स्मि. कॅ. कॉ. इ. म्यु. प्लेट ९ ]. पार्थियन राजा गोंडोफेरस याच्या कारकीर्दीच्या २६ व्या वर्षोंतील (सं.१०३ मधील) पंजाबच्या युसफजई जिल्ह्यांतील तख्तीबही येथें एक खरोष्ठी लिपीतील शिलालेख सांपडला आहे [ ज. ए.; (जर्नल एशियाटिक इ. स. १८९०, भाग १, पान ११९].