विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल रहिमखान.- जहांगीरच्या विरुद्ध बंड करण्यामध्यें खुशरूस ज्या अनेक सरदारांनीं सहाय्य केलें त्यांमध्यें अबदुल रहिमान हा एक होता. त्याला खुशरूबरोबरच पकडण्यांत येऊन लाहोरमध्यें बादशहासमोर उभें करण्यांत आलें. पुढें त्याला शिक्षा म्हणून गाढवाच्या ओल्या कातड्यानें घट्ट शिवण्यांत येऊन तें कातडें नेहमी ओलें ठेवण्याची व्यवस्था केली. अशा वाईट स्थितीमध्यें २४ तास ठेवल्यावर मग त्याला सोडून देण्यांत आलें.