विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगरतला - टिपरा संस्थानचें मुख्य शहर. उ.अ. २३० ५१० , पू. रे. ९१० २१०. इ.स. १९०१ मध्यें येथील लोकसंख्या ९५१३ होती. होरा नदीच्या पश्चिम तीरावर जुनें शहर आहे व नवी वस्ती पूर्वतीरावर झाली आहे. इ.स १८७४-७५ सालीं येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली. इ.स. १९०३-०४ मध्यें येथील उत्पन्न ६७०० रु. होतें व खर्च ७४०० होता. येथें एक कॉलेज, एक कारागिरीची शाळा, संस्कृत पाठशाला, दवाखाना व तुरूंग आहे. (इं.ग्या. )