विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अइ - आसाममधील एक नदी.  ही भूतानमध्यें उगम पावून खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोलपारा जिल्ह्यांतून वहात जाऊन मनास (ब्रम्हपुत्राला मिळणारी एक नदी) नदीला मिळते. ही नदी बहुतेक अरण्यांतून वाहत जाते. हिची लांबी ९५ मैल आहे.  हींत चार टन ओझ्याच्या होड्या चालतात. (इं.गॅ. ५-१९०८)